मुंबई : भाजमधल्या प्रवेशाबाबत निवडणुकीनंतर निर्णय घेणार असल्याची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी घेतलीय. भाजपचा स्कार्फ गळ्यात घातल्याचा वेगळा अर्थ काढू नये असंही त्यांनी नमूद केलंय.
कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांची प्रचार सभा असल्यामुळं मित्रपक्षाच्या सभेत जाणं क्रमप्राप्त असल्याची सारवासारवही त्यांनी केलीय. तर भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनीही खोत यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा नसल्याचं म्हटलंय.
राजू शेट्टी यांनी खोतांच्या मुलाच्या उमेदवारीला विरोध केल्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटना फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडं मुख्यमंत्र्यांच्या प्रचारसभेत सदाभाऊंनी भाजपचा स्कार्फ घातल्यामुळं या चर्चेला आणखीनच धार आलीय.