मुंबई/पुणे: महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या निमित्तानं निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुण्यातील घरावरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. पर्वती पायथ्याशी असलेल्या घराबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात आहे.
बाबसाहेबांना आज मुंबईत महाराष्ट्र भुषण करण्यात येत आहे. त्याला अनेक संघटनांनी विरोध केला आहे. बाबासाहेबांना हात लावल्यास राज्यात तांडव करवेन असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. दरम्यान बाबासाहेब पुरस्कार सोहळ्यासाठी मुंबईत रवाना झाले आहेत. तरीदेखील खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना आज राजभवनात महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते या पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. १० लाख रुपये रोख आणि सन्मान चिन्ह असं या पुरस्कारचं स्वरुप आहे. राजभवनातल्या दरबार हॉलमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे.
यानिमित्तानं सुमारे अडीचशे जणांना निमंत्रण पाठवण्यात आली आहेत. त्यात राज्यसरकारचे मंत्री, आमदार, खासदार, विधीमंडळातली विरोधीपक्ष नेते यांच्यासह समाजतल्या मान्यवरांचा समावेश आहे. मात्र राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे आणि काँग्रेस नेत्यांनी पुरस्काराला उपस्थित न राहण्याची भूमिका घेतलीय.
दरम्यान बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देताना सरकरानं निकष बाजूला ठेवून पुरस्कार दिल्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज सकाळी सुनावणी होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.