नामांकित हॉटेल्सचा वापर अनैतिक संबंधांसाठी

एका तलाठ्याने अनैतिक संबंधांसाठी २३ वर्षीय तरुणीला हॉटेलच्या रुममध्ये ठेवल्याचा किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. जळगावमधील हॉटेल रॉयल पॅलेसमधील हा प्रकार घडला असल्याचं स्थानिक वृतपत्राने म्हटलं आहे.

Updated: Jul 6, 2015, 06:10 PM IST
नामांकित हॉटेल्सचा वापर अनैतिक संबंधांसाठी title=

जळगाव : एका तलाठ्याने अनैतिक संबंधांसाठी २३ वर्षीय तरुणीला हॉटेलच्या रुममध्ये ठेवल्याचा किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. जळगावमधील हॉटेल रॉयल पॅलेसमधील हा प्रकार घडला असल्याचं स्थानिक वृतपत्राने म्हटलं आहे.

तलाठी घनश्याम लांबोडे,  २३ वर्षीय तरुणी आणि हॉटेल मॅनेजर निलेश गायकवाड यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रामानंदनगर पोलीस निरिक्षक प्रवीण वाडिले, महिला कॉनस्टेबल सुजाता राजपूत हॉटेल तपासणी करीत असतांना रजिस्ट्ररमध्ये स्थानिक व्यक्तीच्या नावे रुम बुकिॆग केल्याचे आढळून आले आणि स्थानिकांसाठी हॉटेलमध्ये रुम का? असा संशय आल्यामुळे पोलीसांनी त्या रुमची कसून चौकशी केली. 

ह्या तरुणीकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत, त्यामध्ये अश्लिल व्हिडीओ क्लिप्स मिळाले आहेत. ह्या त्या तरुणीकडे अधिक चौकशी केल्यावर, तिने स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करण्यासाठी वडीलांकडून भाडेतत्वावर रुम घेतल्याचे सांगितले. 

तरुणीने वडिलांचा फोननंबर सांगून दिलेल्या नंबरवर संपर्क साधला असता ज्याच्या नावावर रुम बूक होती तोच व्यक्ती पोलीसांशी बोलला.

फोननंबर ट्रॅक केल्याने ही रुम घन:श्याम लांबोळे यांच्या नावावर असल्याचे उघडकीस आले. तलाठी लांबोळे यांच्यासोबत पाच वर्षापासून प्रेमसंबंध असल्याचे तरुणीने पोलीसांना सांगितले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.