पुण्यातल्या धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस

पुण्यात पावसाची संततधार सुरुच आहे. पुण्यातल्या धरण क्षेत्रातही दमदार पाऊस झाल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यानं मागील वर्षीची पातळी ओलांडली आहे. 

Updated: Jul 10, 2016, 08:03 PM IST
पुण्यातल्या धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस  title=

पुणे : पुण्यात पावसाची संततधार सुरुच आहे. पुण्यातल्या धरण क्षेत्रातही दमदार पाऊस झाल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यानं मागील वर्षीची पातळी ओलांडली आहे. दिवसभरात टेमघरमध्ये ५७ मिलिमीटर , पानशेत ३१, वरसगावमध्ये २८ तर खडकवासल्यात १४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

या पावसामुळे धरणक्षेत्रातील पाणीसाठा ८.९५ टीएमसीवर म्हणजेच ३०.७१ % वर गेला आहे. पुण्यात जूनमध्ये अतिशय कमी पाऊस झाला. धरणातील पाणीसाठा अवघ्या ५ % वर गेला होता. त्यामुळे चिंता वाढली होती. 

जुलैमध्ये पावसानं बॅकलॉग भरून काढत पुणेकराना दिलासा दिला आहे. सध्या शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. तो तसाच ठेवल्यास जानेवारीपर्यंत पुरेल इतका साठा उपलब्ध झाला आहे.