रत्नागिरी : निवळी ग्रामपंचायतीने एका ग्रामस्थाची जमीन लाटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा सारा प्रकार समजल्यानंतर ग्रामपंचायत गप्पच आहे.
मुंबईतून गावाकडे परतलेले मंगेश सावंत. रत्नागिरीच्या निवळी गावात त्यांची साडेपाच गुंठे जागा आहे. पण ती ग्रामपंचायतीनं बळकावली, असा त्यांचा आरोप आहे. परवानगीचे खोटं प्रतिज्ञापत्र तयार करत ग्रामपंचायतीने रस्ता तयार करण्यासाठी आपली जमीन लाटल्याचा आरोप सावंतांनी केलाय. विशेष म्हणजे साक्षर असतानाही त्यांच्या प्रतिज्ञापत्रासाठी अंगठा लावण्यात आला आहे. गेली दोन वर्ष ते जागा परत मिळवण्यासाठी झगडत आहेत.
सावंतांप्रमाणं त्यांचा भाऊ आणि आईच्याही खोट्या सह्या करुन रस्ता तयार केला गेलाय. मूळ योजनेत दाखवलेला रस्ता आणि सध्या सावंतांच्या जमिनीतून गेलेला रस्ता हा वेगळ्या ठिकाणाहून काढला गेलाय. यासंदर्भात सरपंचांना विचारलं असता त्यांनी भलतेच उत्तर दिले.
ग्रामपंचायतीने जागा बळकावल्याने आता मंगेश सावंतांना न्याय मिळणार का ? ग्रामपंचायतीवर कारवाई होणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.