अनधिकृतपणे 'सैराट' सिनेमा दाखविणाऱ्या व्हीडिओ थिएटरवर पोलिसांचा छापा

नागराज मंजुळे यांचा 'सैराट' सिनेमा अनधिकृतपणे दाखवणाऱ्या हिंगोली शहरातील व्हीडिओ मिनी प्लेक्सवर पोलिसांचा छापा मारला. 

Updated: May 24, 2016, 01:40 PM IST
अनधिकृतपणे 'सैराट' सिनेमा दाखविणाऱ्या व्हीडिओ थिएटरवर पोलिसांचा छापा title=

मुंबई : नागराज मंजुळे यांचा 'सैराट' सिनेमा अनधिकृतपणे दाखवणाऱ्या हिंगोली शहरातील व्हीडिओ मिनी प्लेक्सवर पोलिसांचा छापा मारला. 

प्रभारी पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगदीश भंडारवार यांच्या पथकाने हिंगोली शहरातील व्हिडिओ मिनी प्लेक्सवर कारवाई केली. व्हि

डिओ थिएटर चालवणाऱ्या संदीप राजुल्वार आणि स्वप्नेश राजुल्वार या दोन आरोपीसह व्हिडिओमधील एक लाख रुपयांचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. मराठवाडा विभागाचे सैराट सिनेमाचे औरंगाबादमधील अधिकृत वितरक फिजा फिल्म्सचे शौकत पठाण यांच्या तक्रारीवरून हिंगोली पोलिसांची  ही कारवाई केली.