अंबरनाथ : परीक्षा केंद्र बघण्यासाठी घराबाहेर पडलेल्या १२ वीच्या विद्यार्थाचा धावत्या लोकलमधून पडून दुर्दैवी मूत्यू झाला आहे. अंबरनाथ आणि बदलापूर स्थानका दरम्यान ही घटना घडली.
अनिरूद्ध शंभरकर असं या विद्यार्थाचं नाव आहे. तो उल्हासनगरमधल्या कॅम्पनंबर चार परिसरात राहणारा होता. अनिरूद्धच्या अपघाती मूत्यूमुळे त्याच्या कुटुबांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद दाखल करण्यात आली आहे.