सातारा : ‘एसपी साहेब याद राखा, माझ्याशी गाठ आहे’ यापुढे माझ्याकडून सहकार्याची अपेक्षा ठेऊ नका, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी पोलीस अधीक्षकांना दिलाय.
सातारा शहरातल्या गुंडगिरीविरोधात उदयनराजेंनी सातारा पोलीस मुख्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केलं. मात्र, पोलीस अधीक्षक निवेदन स्वीकारण्यास न आल्याने ते रागारागाने निघून गेले.
‘कार्यालयात येऊन निवेदन द्या, मी स्वीकारतो’ असा निरोप अधीक्षकांनी दिला होता. अखेर पोलीस इन्स्पेक्टर घनवट यांनी तक्रारींचं निवेदन स्वीकारल्यावर एक दिवसांचं उपोषण त्यांनी 25 मिनिटांत गुंडाळलं.
दरम्यान, आमच्या मुसक्या बांधण्याची मजल आजही कुणामध्ये नाही, उद्याही नसल्याचा इशारा आपल्या बंधूवर नाराज झालेल्या खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंना दिलाय.
विधानसभा निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचं सातारा शहरातूनच मताधिक्य घटलं. विशेष म्हणजे सातारा नगरपालिकेत आमदार शिवेंद्रसिंहराजेंची नगर विकास आघा़डी आणि खासदार उदयनराजे भोसले यांची सातारा विकास आघाडीची सत्ता आहे. त्यावर नाराज होत आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आपले हात दगडाखाली सापडल्याची टीका अप्रत्यक्षपणे खासदार उदयनराजे भोसलेंवर केली होती. त्याचा उदयनराजेंना प्रचंड राग आला होता. त्यावर उदयनराजेंनी शिवेंद्रसिंह राजे भोसलेंना ‘जनतेवर प्रेम करायला शिका, जनतेची कामं करा’ असा सल्ला दिला. तसंच आमच्या मुसक्या बांधणारं आजही कुणी नाही आणि उद्याही कुणी नसल्याचंही म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.