'अविश्वासा'नंतर तुकाराम मुंढेंनी घेतली मुख्यमंत्र्यांच्या सचिवांची भेट

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केलाय. 

Updated: Oct 26, 2016, 05:50 PM IST
'अविश्वासा'नंतर तुकाराम मुंढेंनी घेतली मुख्यमंत्र्यांच्या सचिवांची भेट  title=

मुंबई : नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केलाय. 

मुंढे यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या सचिवांची भेट घेतली. महापालिकेनं आपल्याविरुद्ध मांडलेल्या अविश्वास ठरावाबबत त्यांनी आपली बाजू यावेळी मांडलीय. महापालिकेचा अविश्वास आणि कामकाजाचा अहवालच यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडलाय. त्यामुळे, आता मुख्यमंत्री या अविश्वास ठरावाबाबत काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.  

दरम्यान, 'अविश्वास ठरावाच्या वेळी मला बोलायचं होतं... राजशिष्टाचारानुसार सगळे बोलले. पण मला जाणीवपूर्वक बोलू देण्यात आलं नाही... मला सर्व आरोप खोडून काढायचे होते. मी कधीच कुणाला उद्धट बोललो नाही' असं म्हणत तुकाराम मुंढे यांनी आपली खंत 'झी 24 तास'समोर व्यक्त केली होती.