नगर अपघातात महिला ठार, जमावाने ट्रक पेटवला

नगर-औरंगाबाद रस्त्यावर भीषण अपघातात महिला ठार झाली. त्यानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला.

Updated: Oct 14, 2016, 04:18 PM IST
नगर अपघातात महिला ठार, जमावाने ट्रक पेटवला title=

अहमदनगर : नगर-औरंगाबाद रस्त्यावर भीषण अपघातात महिला ठार झाली. त्यानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला.

दुचाकीवरुन जाणाऱ्या महिलेला एका ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघात महिला गंभीर जखमी झाली. गंभीर जखमी दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला. तर एकजण जखमी झाला. 

या अपघातानंतर संतप्त जमावाने वाहतूक रोखून धरली. अगोदर या ट्रकच्या काचा फोडल्या आणि त्यानंतर ट्रकच जमावाने पेटवून दिला. त्यामुळे काहीवेळ येथे तणावग्रस्त वातावरण होते.