कोकण रेल्वेवर टळला मोठा अपघात

कोकण रेल्वे मार्गावर वीर स्टेशनच्या पुढे धावत्या मांडवी एक्सप्रेसवर झाड पडलं. 

Updated: Jul 3, 2016, 05:27 PM IST
कोकण रेल्वेवर टळला मोठा अपघात  title=

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर वीर स्टेशनच्या पुढे धावत्या मांडवी एक्सप्रेसवर झाड पडलं. B 4 एसी कोचवर हे झाड़ पडले मात्र सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडलेली नाही. धावती ट्रेन थांबवण्यात मोटरमनला यश आलं. 

एसी डब्यावर हे झाड पडल्यानं कोणाला दुखापत नाही जर पाठीमागे जनरल डब्यावर हे झाडं पडलं असतं तर मोठी दुर्घटना झाली असती. थोड्या वेळामध्येच झाड़ बाजूला करण्यासाठी टीम दाखल झाली आणि ट्रेनवरील झाड़ बाजूला करण्यात आलं. मात्र पडलेल्या झाडामुळे कोकण रेल्वे मार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.