एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी

एक्स्प्रेस वेवर वाहतूकीची कोंडी झालीये. पुण्याकडे जाणा-या मार्गावर प्रचंड ट्राफीकजाम झालंय.

Updated: Feb 27, 2016, 12:28 PM IST
एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी title=

लोणावळा: एक्स्प्रेस वेवर वाहतूकीची कोंडी झालीये. पुण्याकडे जाणा-या मार्गावर प्रचंड ट्राफीकजाम झालंय. एक्सप्रेस हायवेवर दरडी प्रतिबंधक जाळ्या बसवण्याचं काम सुरु झालंय. त्यासाठी बोर घाटामध्ये अमृतांजन पूलाजवळ मुंबईहून पुण्याकडे जाणारी एक लेन बंद ठेवण्यात आलीये.

यामुळे ही वाहतूक कोंडी निर्माण झालीये. 11 मार्चपर्यंत हे जाळी बसवण्याचं काम सुरु रहाणार असल्यानं या मार्गावर 11 मार्च पर्यंत प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.