डॉक्टरांना मारहाण करणारे ३ जण अटकेत

रूग्णाला अॅडमिट करून घ्यावे या मागणीसाठी रूग्णाच्या मद्यपी नातेवाईकांनी डॉक्टरांना आणि नर्सला मारहाण केली. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 8, 2017, 03:30 PM IST
डॉक्टरांना मारहाण करणारे ३ जण अटकेत title=

मनमाड : रूग्णाला अॅडमिट करून घ्यावे या मागणीसाठी रूग्णाच्या मद्यपी नातेवाईकांनी डॉक्टरांना आणि नर्सला मारहाण केली. 

याच्या निषेधार्थ आज मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील सर्व शासकीय हॉस्पिटल्समध्ये लाक्षणिक संप पुकारण्यात आला होता. या संपामुळे नागरिकांचे हाल होत होते. 

मात्र आरोग्य मंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. डॉक्टरांना सुरक्षेचं आश्वासन आणि हल्लेखोर तिघांना अटक केल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. वैद्यकीय सेवा पूर्ववत सुरू झाली.