नववर्ष 2016 व 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क...
Posted by Pramod Kamble on Tuesday, 29 December 2015
रत्नागिरी : ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर पोलिसांकडून वाहनांची कसून चौकशी केली जातेय.
गोव्यातून येणाऱ्या आराम गाड्यांसह अनेक पर्यटकांच्या गाड्यामधूनही दारू आणली जाते. महाराष्ट्राचा महसूल चुकवून ही दारू आणली जात असल्याने अशा वाहन चालकांवर कारवाई केली जात आहे.
महाराष्ट्रातील अनेक शहरात व्यावसायिक विक्रीसाठी दारूचा साठा गोव्यातून आणला जातो. मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात वाहनाची तपासणी करून ही दारू पकडली जात आहेत.
नववर्षाचं स्वागत आणि त्यानिमित्ताने बाहेर पडलेले पर्यटक यांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी महामार्गावर खबरदारी घेतली जातेय. तसंच दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर रत्नागिरी महामार्ग पोलिसांकडून कारवाई केली जातेय.