चोराने गरजेपुरता १८ हजार ठेवले, ८२ हजार परत केले

 परिस्थिती माणसाला काय करायला लावेल हे सांगता येत नाही, पण चोराने नैतिकतेला साक्ष ठेवून गरजेपुरता पैसे वापरले आणि बाकीचे पैसे परत केले.

Updated: Mar 8, 2015, 01:21 PM IST
चोराने गरजेपुरता १८ हजार ठेवले, ८२ हजार परत केले title=

जळगाव :  परिस्थिती माणसाला काय करायला लावेल हे सांगता येत नाही, पण चोराने नैतिकतेला साक्ष ठेवून गरजेपुरता पैसे वापरले आणि बाकीचे पैसे परत केले.

केळी आणि कापूस विकून शेतकरी भारत शिंदे यांना एक लाख रूपये हाती आले. पैसे घरात ठेऊन संपूर्ण शिंदे कुटुंबिय लग्नाला गेलं, या दरम्यान शिंदे यांच्या घरातून एक लाखांची चोरी झाली.

मात्र शेतकऱ्याच्या कष्टाच्या पैशांची जाण चोरालाही असावी, म्हणून चोराने भारत शिंदे यांच्या मागच्या दारात ८२ हजारांची रोकड  ठेवून एक चिठ्ठीही सोबत टाकली. यात महिलेने आपले नाव उमा देवी लिहिले आहे. या महिलेला दवाखान्यासाठी १८ हजार रूपये खर्च आला असल्याचं सांगण्यात येतंय.
 
पतीच्या उपचारासाठी आपल्याला पैशांची चोरी करावी लागली, मात्र पैसे हातात असूनही पतीचं निधन झालं, या पैशातून दवाखान्याचं बिल आणि पार्थिव घरी नेण्याचा खर्च झाला, मात्र उर्वरीत रक्कम चोराने परत केल्याचं, चिठ्ठीत लिहिलं आहे. या चिठ्ठीवरून महिलेवर परिस्थितीमुळे चोरी करण्याची वेळ आली असावी, असं समजून शिंदे यांनी पोलिसांत तक्रार केली नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.