जळगावचा पारा दिवसेंदिवस चढता, ४५ अंशावर तापमान

जिल्ह्याचा पारा दिवसेंदिवस चढता आहे. ४२ अंशावर असलेला पारा  तब्बल ४५ अंशावर पोहचल्याने नागरिकांना अक्षरशः घराबाहेर पडने मुश्किल झाले आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 15, 2017, 08:26 AM IST
जळगावचा पारा दिवसेंदिवस चढता, ४५ अंशावर तापमान title=

जळगाव : जिल्ह्याचा पारा दिवसेंदिवस चढता आहे. ४२ अंशावर असलेला पारा  तब्बल ४५ अंशावर पोहचल्याने नागरिकांना अक्षरशः घराबाहेर पडने मुश्किल झाले आहे. 

सकाळपासून उन्हाचे चटके लागायला सुरुवात होते. दुपारी अंगाची लाही लाही करणारे ऊन नागरिकांना हैरान करुन सोडतेय. एप्रिल हिटनेच उन्हाची झळ प्रचंड आहे. त्यामुळे मे मध्ये काय परिस्थिति राहील याच्या कल्पनेनं लोक धास्तावलेत.

धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात शुक्रवारी तापमानाचा पारा ४४ अंशां पर्यत गेला. या हंगामातील या दोन्ही जिल्ह्यात हे सर्वाधिक तापमान आहे. वाढलेल्या तापमानाचा परिणाम जनजीवनावर दिसून आला. अनेकांनी काम असूनही घराबाहेर जाणे टाळले. दुपारी धुळे आणि नंदुरबार शहरातील सर्व रस्ते ओस पडले होते. 

नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी विविध साधनाचा वापर करीत असून, याच काळात शीत पेयांना हि मागणी वाढली आहे. एप्रिल महिन्याचे सरासरी तापमान ४३ अंश सेल्सियस राहिले आहे.