बुलडाणा : खामगाव आदिवासी आश्रमशाळेतील बलात्कार प्रकरणी आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे चारही आरोपी शाळेचे कर्मचारीच आहे.
यानंतर या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या 15 वर पोहोचली आहे. यामध्ये मुख्य आरोपी इतुसिंग पवार आणि संस्थाचालक, शिक्षक व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी अकरा जणांना 10 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
दरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर या घटनास्थळी पोहचल्यात...बलात्कार प्रकरणाची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी शुक्रवारी रहाटकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन झालेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली.
त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीनं महिला आयपीएस अधिका-याच्या अंतर्गत चौकशीचे आदेश दिले आहेत. तर एसआयटी स्थापन करण्यात आली असून नागपूच्या सीआयडी प्रमुखही चौकशीसाठी बुलढाण्याला जाणार असल्याची माहिती पोलीस महासंचालक सतीष माथूर यांनी दिलीय.