ठाणे शहरात जोरदार अतिक्रमण हटाव मोहिम

 खासकरून या भागात हुक्का पार्लर मोठ्या प्रमाणात आहेत.

Updated: Dec 5, 2016, 11:09 PM IST
ठाणे शहरात जोरदार अतिक्रमण हटाव मोहिम  title=

ठाणे : शहरात महापालिकेने रस्ता रुंदीकरण मोहीम हाती घेतल्यावर पालिकेने शहरातल्या अनधिकृत लॉजेस, बारवर जोरदार हातोडा चालवला. 

आता महापालिकेने आपला मोर्चा कळवा, मुंब्रा, डायघर, शिळफाटा या विभागाकडे वळवलाय. 

या भागातल्या लॉजेस, लेडीजबारवर पालिकेचा हातोडा पडायला सुरूवात झालीय. 

आज दिवसभरात जवळपास ३ लेडीज बार ,१० लॉडेज , २० हुक्का पार्लर आणि शेकडो संख्येने गॅरेजस जमिनोदोस्त करण्यात आलीय.

 खासकरून या भागात हुक्का पार्लर मोठ्या प्रमाणात आहेत.