गोष्ट एका टेक-सॅव्ही पोलिसाची...

ही बातमी आहे पुण्यातल्या एका हुशार पोलीस कर्मचाऱ्याची... रविंद्र इंगवले यांची... रविंद्र यांचं शिक्षण फक्त बारावी... पण कॉम्प्युटरवर त्यांची बोटं अशी काही फिरतात, की त्यांनी चक्क दहा ते बारा कॉम्प्युटर सिस्टीम्स विकसित केल्या आहेत. त्यामुळे पोलीस स्टेशनमधली कामं चुटकीसरशी होतायत.

Updated: Apr 13, 2015, 11:13 PM IST
गोष्ट एका टेक-सॅव्ही पोलिसाची...  title=

पुणे : ही बातमी आहे पुण्यातल्या एका हुशार पोलीस कर्मचाऱ्याची... रविंद्र इंगवले यांची... रविंद्र यांचं शिक्षण फक्त बारावी... पण कॉम्प्युटरवर त्यांची बोटं अशी काही फिरतात, की त्यांनी चक्क दहा ते बारा कॉम्प्युटर सिस्टीम्स विकसित केल्या आहेत. त्यामुळे पोलीस स्टेशनमधली कामं चुटकीसरशी होतायत.

रविद्र इंगवले यांनी बनवलेल्या कॉम्प्युटर सिस्टीममुळे पोलीस दलाचे लाखो रुपये वाचले आहेत. विज्ञान शाखेत बारावी पास झाल्यानंतर त्यांनी परीस्थितीमुळे शिक्षण सोडून नोकरी स्वीकारली. गणपती उत्सव काळात पाच हजार पोलीस मित्र, शस्त्र परवान्याचं डिजीटायझेशन, हॉटेलचे परवाने, पोलीस वसाहतींची माहिती अशा अनेक गोष्टींसाठी त्यांनी कॉम्प्युटर सिस्टीम तयार केलीय. 

रवींद्र इंगवले पुणे पोलीस आयुक्तलयात परकीय नोंदणी विभागात काम करतात. या विभागाचा परदेशी नागरिकांशी सतत संपर्क होत असतो. या ठिकाणी आलेल्या परदेशी नागरिकांना माहिती हाताने लिहून दिली जात होती. त्यामध्ये काही वेळा चुका होत होत्या. यासाठी रविंद्र यांनी एक संगणक प्रणाली विकसित केली, ज्याचा आज चांगलाच उपयोग होताना दिसतोय, असं पोलीस उपायुक्त संजय पाटील यांनी म्हटलंय.  

अनेक वेळा नागरिकांना पोलीस स्टेशनला गेल्यावर तासनतास बसावं लागतंय. जर इंगवलेसारख्या सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी प्रोत्साहन मिळालं, तर पोलीस दलाचं काम नक्कीच आणखी जलद आणि सुसह्य होऊ शकेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.