अल्पवयीन तरुणीची छेडछाडीला कंटाळून आत्महत्या

कोपरगावमध्ये एका सतरा वर्षीय तरुणीनं छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केलीय. 

Updated: Dec 22, 2015, 07:03 PM IST
अल्पवयीन तरुणीची छेडछाडीला कंटाळून आत्महत्या  title=

शिर्डी : कोपरगावमध्ये एका सतरा वर्षीय तरुणीनं छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केलीय. 

करंजी इथल्या कालव्यात या तरुणीचा मृतदेह आढळून आला. छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याचे तिने लिहिलेल्या चिठ्ठीत उघड झाली.

गावातल्या चार टारगट मुलांच्या छेडछाडीने संबंधित मुलगी त्रस्त होती. या मुलांनी सोशल मीडियावर तिचे अश्लील फोटो व्हायरल केले होते. 

काही टार्गट मुले येता जाता तिची छेड काढत असल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केलाय. याप्रकरणी कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.