डोंबिवली : स्मृतिभ्रंश किंवा अल्झायमर्स हा आजार हद्दपार करणारं औषध एका डोंबिवलीकर तरुणीनं शोधून काढलंय. ब्रिटनमध्ये मँचेस्टर विद्यापीठात संशोधन करून स्वानंदा मोडक यांनी बेन्झोपायरॉल्ड हे रसायन विकसित केलंय. त्याचं अमेरिका आणि युरोपमध्ये पेटंटही त्यांनी मिळवलंय, तर जपानकडे पेटंटसाठी अर्ज केलाय.
या औषधाचे उंदरांवरचे प्रयोग यशस्वी झालेत. आगामी काळात त्याच्या क्लिनिकल टेस्ट घेण्यात येतील. साधारण ४ ते ५ वर्षांत हे औषध उपचारासाठी उपलब्ध होऊ शकेल.
स्वानंदा या डोंबिवलीच्या मॉडेल हायस्कूल आणि पेंढारकर कॉलेजच्या विद्यार्थिनी आहेत. त्यांनी मँचेस्टर विद्यापीठात मेडिकल जेनेटिक्समध्ये मास्टर्स मिळवलीये. त्यांच्या आजोबांना स्मृतिभ्रंश होता. अल्झायमर्स झालेल्या रुग्णाचा किती सांभाळ करावा लागतो, हे त्यांनी जवळून बघितलं होतं. त्यामुळे या आजारावर कायमस्वरुपी उपाय शोधून काढण्याच्या ध्यासातून स्वानंदा यांनी हे संशोधन केलं.