पुण्यात साखर संकुलाची तोडफोड

पुण्यात साखर संकुलनाची तोडफोड करण्यात आली आहे.  स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊसदराबाबत आक्रमक झाल्याने, ऊसदराचं आंदोलन चिघळलं आहे.

Updated: Jan 12, 2015, 02:26 PM IST
पुण्यात साखर संकुलाची तोडफोड title=

पुणे : पुण्यात साखर संकुलनाची तोडफोड करण्यात आली आहे.  स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊसदराबाबत आक्रमक झाल्याने, ऊसदराचं आंदोलन चिघळलं आहे.

एफआरपीच्या मुद्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालीय आणि ते पडसाद आज उमटले आहेत. पुण्यात ऊसदराच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीन साखर संकुलाजवळ ठिय्या आंदोलन सुरु असतानाच, स्वाभिमानीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी साखर संकुलात दगडफेक करत सरकारविरोधात आपला निषेध व्यक्त केलाय.
 
स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊसदराच्या प्रश्नावर मागील काही दिवसांपासून सरकारवर टीका करतांना दिसतेय, मात्र,  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागण्यांकडे सत्ताधाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचं दिसून आलं आहे.

पुण्यात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात साखर संकुलाजवळ ठिय्या आंदोलन सुरु होतं. याच आंदोलनाच्या दरम्यान कार्यकर्ते भडकले आणि त्यांनी थेट साखर संकुलनाची तोडफोड केली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.