'त्या' चिमुरडीला क्रूर मातेनचं दुसऱ्या मजल्यावरून फेकलं

डोंबिवलीच्या शुभदा नर्सिंग होममधून 12 मार्च या दिवशी एका पाच दिवसाच्या मुलीला खाली फेकून देण्यात आलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी या मुलीच्या आईला सुजाता गायकवाड हिला अटक केलीय. 

Updated: Apr 15, 2015, 08:27 PM IST
'त्या' चिमुरडीला क्रूर मातेनचं दुसऱ्या मजल्यावरून फेकलं title=

डोंबिवली : डोंबिवलीच्या शुभदा नर्सिंग होममधून 12 मार्च या दिवशी एका पाच दिवसाच्या मुलीला खाली फेकून देण्यात आलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी या मुलीच्या आईला सुजाता गायकवाड हिला अटक केलीय. 
 
डोंबिवलीच्या शुभदा हॉस्पिटलमध्ये 7 मार्च रोजी सुजाता गायकवाड यांनी एका गोंडस मुलीला त्यांनी जन्म दिला होता. पण, 12 मार्च रोजी या चिमुरडीला हॉस्पीटलच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकून देण्यात आलं... आणि ती जागीच गतप्राण झाली.

मात्र, आपण आपल्या मुलीला पाळण्यात झोपवून रुमबाहेर गेलो असताना कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं आपल्या बाळाला हॉस्पीटलच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकून दिलं, असा बनाव सुजाता आणि तिच्या कुटुंबीयांनी केला. आपण, रुममध्ये परतलो तेव्हा पाळण्यात बाळ नव्हतं... आपण शोधाशोध केली तेव्हा एका रूग्णाच्या नातेवाईकाला हे बाळ शुभदा हॉस्पिटलच्या खाली मृतावस्थेत पडलेलं आढळलं, असं म्हणत सुजात आणि तिच्या कुटुंबीयांनी आकांडतांडवही केलं होतं. 

यानंतर, राम नगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण, सोबतच मुलगी झाली म्हणून घरातल्याच कुणा व्यक्तीनं हे भयानक कृत्य तर केलं नसेल ना याबद्दलही पोलीस साशंक होते. अखेर पोलिसांनी या चिमुरडीची आई सुजाता हिलाच अटक केलीय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.