राज-टॅक्‍सीवाल्यांचा 'डीएनए' सारखाच-स्वामी

राज ठाकरे कितीही वाद घालत असले तरी त्यांचा आणि उत्तर प्रदेशातील टॅक्‍सीचालकांचा 'डीएनए'देखील सारखाच आहे, असा टोला माजी केंद्रीय मंत्री तसेच खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी आज लगावला. 

Updated: May 23, 2016, 11:08 AM IST
राज-टॅक्‍सीवाल्यांचा 'डीएनए' सारखाच-स्वामी title=

नागपूर : राज ठाकरे कितीही वाद घालत असले तरी त्यांचा आणि उत्तर प्रदेशातील टॅक्‍सीचालकांचा 'डीएनए'देखील सारखाच आहे, असा टोला माजी केंद्रीय मंत्री तसेच खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी आज लगावला. 

भारतात आर्य आणि द्रविड या मुद्यावरून उत्तर आणि दक्षिण भागातील लोकांमध्ये वाद आहेत, पण या देशाच्या चारही भागांमधील लोकांचे डीएनए सारखेच असल्याचं सुब्रह्मण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे.

डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी डीएनएचा मुद्दा उपस्थित केला. सौदी अरेबियात एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्‍नाचा संदर्भ देत होते.

'या देशाचा इतिहास इंग्रजांनी चुकीच्या पद्धतीने सांगितला आणि आजही तोच इतिहास शिकवला जातोय. मात्र आता येत्या तीन वर्षांत देशभरात इतिहासाची अभ्यासक्रमातील पुस्तके बदलण्यात येतील. त्याचे काम सुरू झाले आहे,'अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली.