पुणे : विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा बारावीच्या परीक्षेचा तणाव दूर व्हावा, यासाठी पुण्यातल्या भावे हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचं विशेष स्वागत करण्यात आलं.
राज्यात आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरूवात होत आहे. परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत पाहून सर्वच कुतूहलाने पाहत होते.
विद्यार्थ्यांचं औक्षण करुन आणि गुलाबाचं फुल देऊन स्वागत करण्यात आलं आणि त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अधिकारीही उपस्थित होते.