सोशल मीडियाने ओळखला 'सेल्फी मॅन'

महाड पूल कोसळला, दोन एसटीबस सह काही वाहनं वाहून गेली, अद्याप बस आणि अनेक मृतदेहांचा तपास सुरू आहे.

Updated: Aug 4, 2016, 05:53 PM IST
सोशल मीडियाने ओळखला 'सेल्फी मॅन' title=

मुंबई : महाड पूल कोसळला, दोन एसटीबस सह काही वाहनं वाहून गेली, अद्याप बस आणि अनेक मृतदेहांचा तपास सुरू आहे. मुख्यमंत्र्यांसोबत बुधवारी पालक मंत्री प्रकाश मेहता यांनी घटनास्थळी पाहणी केली.

याच वेळेच्या एका व्हिडीओ एक व्यक्ती मुख्यमंत्र्यांच्या मागे सेल्फी काढत असताना दिसतेय. ही व्यक्ती कोण आहे असा प्रश्न आम्ही प्रेक्षकांनाच केला, या बातमीत ही व्यक्ती कोण यावर कोणताही 'प्रकाश' टाकलेला नव्हता. 

सोशल मीडियावर दमदाटी करणारे कार्यकर्ते कोणत्या पक्ष-संघटनेचे

पण या बातमीत सोशल मीडियावरील प्रेक्षकांनी ही व्यक्ती म्हणजे आपल्या रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता असल्याचं ओळखलं आहे. काहींनी यावर दु:ख व्यक्त केलं आहे, तर काहींनी आपल्या पक्षाचा नेता असं कसं करू शकतो असंही म्हटलंय, पण काही खोट्या राजकीय पक्षप्रेमींनी यावर मीडियाला लाखोली वाहिली आहे.

एकाने तर तुम्ही कॅमेरे घेऊन जातात असं म्हणत मीडियाला दोष दिला आहे. वास्तविक ही व्यक्ती कोण, ही सेल्फी काढण्याची जागा आहे का? घटनेचं या व्यक्तीला गांभीर्य आहे का? या आशयाखाली ही बातमी आहे. तरीही आपल्या नेत्याला असं पाहून काही व्यथित झालेल्या व्यक्तींनी मीडियावर आगपाखड केली आहे.