चुलत भावाने चिमुरड्या बहिणीचा केला खून

राग मस्तकात शिरलेल्या चुलत भावाने आपल्या चिमुरड्या बहिणीचा खून केलाय. औरंगाबादच्या जैतापूर शिवारात असलेल्या वस्तीत ही विकृत आणि तितकीच धक्कादायक घटना घडलीय. आणि हा खुनी आहे अवघ्या अकरा वर्षांचा.

Updated: Aug 12, 2015, 10:01 AM IST
चुलत भावाने चिमुरड्या बहिणीचा केला खून  title=

औरंगाबाद : राग मस्तकात शिरलेल्या चुलत भावाने आपल्या चिमुरड्या बहिणीचा खून केलाय. औरंगाबादच्या जैतापूर शिवारात असलेल्या वस्तीत ही विकृत आणि तितकीच धक्कादायक घटना घडलीय. आणि हा खुनी आहे अवघ्या अकरा वर्षांचा.

या चार वर्षांच्या चिमुरडीचा सुडाने पेटलेल्या तिच्या अल्पवयीन चुलत भावाने गळा आवळून खून केला. दोन वर्षांपूर्वी किरकोळ कारणावरून मुलीच्या वडिलांनी तिच्या अकरा वर्षीय चुलत भावाला बेदम मारहाण केली होती. ही मारहाण त्याच्या मस्तकात बसली आणि त्याने आपली बहीण घरात एकटी असल्याचं पाहून तिचा गळा आवळून खून केला.

पीडित मुलगी आणि हत्या करणारा दोघेही अल्पवयीन असल्यानं आम्ही त्यांची ओळख जाहीर न करण्यात आलाय. हा धक्कादायक प्रकार घडल्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

पाहा व्हिडिओ :

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.