नगरपंचायत निवडणूक: सिंधुदुर्गात राणे-केसरकरांची प्रतिष्ठा पणाला

सिंधुदुर्गमध्ये वैभववाडी आणि दोडामार्ग नगरपंचायतीसाठी आज मतदान होतंय. नारायण राणे दीपक केसरकर यांची प्रतिष्ठा पुन्हा एकदा पणाला लागलीय.

Updated: Nov 1, 2015, 11:57 AM IST
नगरपंचायत निवडणूक: सिंधुदुर्गात राणे-केसरकरांची प्रतिष्ठा पणाला title=

विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गमध्ये वैभववाडी आणि दोडामार्ग नगरपंचायतीसाठी आज मतदान होतंय. नारायण राणे दीपक केसरकर यांची प्रतिष्ठा पुन्हा एकदा पणाला लागलीय.

आणखी वाचा - राणेंच्या बालेकिल्ल्यात पुन्हा एकदा दे धक्का, तोही काँग्रेस बंडखोरांकडून

दोडामार्गमध्ये १७ जागांसाठी तर वैभववाडीत चौदा जागांसाठी मतदान होत आहे. दोडामार्गमध्ये शिवसेना-भाजपा युती विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असा सामना होतोय. हा मतदारसंघ दीपक केसरकर यांचा आहे सहाजिकच केसरकर यांनी स्वतः लक्ष घातलं आहे. 

तर वैभववाडी हा नितेश राणे यांचा मतदार संघ आहे. नितेश राणे हे या मतदार संघात १५ दिवस तळ ठोकून होते. वैभववाडीतील ३ मतदार संघात बिनविरोध उमेदवार विजयी झालेत. इथं १४ जागांसाठी मतदान होत आहे. दोन्ही निवडणुका या जिल्ह्यातलं वर्चस्व सिद्ध करणाऱ्या निवडणुका आहेत, सहाजिकच या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

आणखी वाचा - दादर - सावंतवाडी विशेष रेल्वे आठवड्यातून तीन दिवस धावणार

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.