मुंबई : आगामी नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेनेची युती होण्याची शक्यता आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यात आज याबाबत सविस्तर चर्चा झाली. या चर्चेचा तपशील राऊतांनी उद्धव ठाकरेंना जाऊन दिला.
त्यानंतर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातही फोनवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे युती होण्याच्या दिशेनं सकारात्मक हालचाली सुरू झाल्यात. कोटा सिस्टीम नव्हे, तर निवडून येण्याच्या निकषावर जागावाटप व्हावं, याबाबत दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाल्याचं समजतं आहे.
युतीच्या दिशेनं स्थायिक कार्यकर्त्यांनी मनं वळवण्याचे प्रयत्न दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून करण्यात येणार आहेत. युतीबाबतची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.