'पोकेमॉन गो'ला शिवसेनेचा विरोध

पोकेमॉन गो या गेमबाबत काळजी घेण्याबाबत सरकारने अलर्ट जाहीर करावा, अशी मागणी शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. 

Updated: Jul 22, 2016, 08:51 PM IST
'पोकेमॉन गो'ला शिवसेनेचा विरोध  title=

मुंबई : पोकेमॉन गो या गेमबाबत काळजी घेण्याबाबत सरकारने अलर्ट जाहीर करावा, अशी मागणी शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. विधानपरिषदमध्ये औचित्याच्या मुद्द्याद्वारे त्यांनी ही मागणी केली आहे.

पोकेमॉन गो हा मोबाइल गेम सध्या लोकप्रिय होते आहे. काही लोकं गाडी चालवतांना गेम खेळतात. अनेक ठिकाणी गेम खेळतांना अपघात झाले, दुर्घटना टळल्या आहेत, तेव्हा या वाढत्या लोकप्रिय मोबाइल गेमबाबत अलर्ट जाहीर करावा अशी मागणी नीलम गो-हे यांनी सभागृहात केली आहे.