शिवसेनेच्या उमेदवाराने पत्नीच्या डोक्यात फेकून मारला नारळ

एकीकडे सगळेच राजकीय पक्षाचे नेते महिलांसाठी आरक्षित वार्डात आपल्या पत्नीला तिकीट मिळावं म्हणून प्रयत्न करत आहेत. पण यातच एक वेगळी बातमी ठाण्यातून आली आहे. उमेदवारीसाठी पती-पत्नीमध्येच वाद झाल्याची घटना समोर आली आहे.

Updated: Feb 6, 2017, 03:47 PM IST
शिवसेनेच्या उमेदवाराने पत्नीच्या डोक्यात फेकून मारला नारळ title=

ठाणे : एकीकडे सगळेच राजकीय पक्षाचे नेते महिलांसाठी आरक्षित वार्डात आपल्या पत्नीला तिकीट मिळावं म्हणून प्रयत्न करत आहेत. पण यातच एक वेगळी बातमी ठाण्यातून आली आहे. उमेदवारीसाठी पती-पत्नीमध्येच वाद झाल्याची घटना समोर आली आहे.

ठाण्यात शिवसेनेने माजी नगरसेवक माणिक पाटील यांना तिकीट दिलं. तर पत्नीला तिकीट न मिळाल्याने त्या नाराज झाल्या. यामध्ये त्यांच्यात वाद झाला आणि माणिक पाटील यांनी संगीता यांच्या डोक्यात नारळ मारुन फेकला. संगीता पाटील या शिवसेनेच्या पदाधिकारी आहे पण त्यांच्या पतीला तिकीट देण्यात आलं.

माजी नगरसेवक माणिक पाटील आणि नगरसेविका संगीता पाटील यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरु असल्याचं देखील बोललं जातंय. दोघेही वेगवेगळे राहतात. रविवारी माणिक पाटील हे प्रचार सुरु करण्याआधी मंदिरात नारळ फोडण्यासाठी गेले होते. त्यावेळेस संगीता पाटील देखील मंदिरात आल्या आणि दोघांमध्ये वाद झाला. रागात माणिक पाटील यांनी संगीता यांच्या डोक्यात नारळ मारुन फेकला. पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहे.