मुंबई मनपा निवडणूक शिवसेना-भाजप एकत्रितच लढणार - मुख्यमंत्री

मुंबई मनपा निवडणूक शिवसेना-भाजप एकत्रित लढणार, अशी महत्वाची माहिती मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात दिलीय. 

Updated: May 24, 2015, 04:45 PM IST
मुंबई मनपा निवडणूक शिवसेना-भाजप एकत्रितच लढणार - मुख्यमंत्री title=

कोल्हापूर: मुंबई मनपा निवडणूक शिवसेना-भाजप एकत्रित लढणार, अशी महत्वाची माहिती मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात दिलीय. 

तसंच मंत्रिमंडळ विस्तारात घटक पक्षांना न्याय मिळणार, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते कोल्हापूर इथं आयोजित तीन दिवसीय भाजपच्या राज्यस्तरीय कार्यकारणी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते.  

कोल्हापूरमध्ये सुरु असलेल्या भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत रावसाहेब दानवे यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रं औपचारिकरित्या स्वीकारली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रावसाहेब दानवे यांच्या सरपंच ते भाजप प्रदेशाध्यक्ष या भरारीचं कौतुक केलं. 

तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचं भाषण मिश्किलतेनं भरलेलं आणि चुरचुरीत होतं. समारोपीय भाषणात नितीन गडकरींनी काँग्रेसवर सडकून टीका केली. तर राष्ट्राच्या विकासासाठी सुशासन आवश्यक असून सर्व प्रश्नांना प्राधान्य देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचं गडकरी म्हणाले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.