परभणी : परभणीतून अजून एका तरुणाला एटीएसने ताब्यात घेतलंय.
आयसीसच्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन या तरुणाला ताब्यात घेण्यात आलंय. शेख इक्बाल शेख कबीर अहमद असं या तरुणाचं नाव आहे. शेख इक्बाल २४ वर्षांचा आहे.
परभणीच्या मदिना नगरातून सकाळी त्याला ताब्यात घेण्यात आलं. परभणीत एटीएसनं केलेली ही तिसरी कारवाई आहे. यापूर्वी एटीएसनं परभणीतून दोघांना ताब्यात घेतलं होतं.