डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

कल्याण शीळ मार्गालगत असलेल्या लोढा हेवन या हायप्रोफाईल सोसायटीत पाळणाघर चालवणा-या महिलेच्या भावाने अल्पवयीन मुलीवर वर्षभरापासून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. 

Updated: May 20, 2016, 11:44 AM IST
डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार title=

डोंबिवली : कल्याण शीळ मार्गालगत असलेल्या लोढा हेवन या हायप्रोफाईल सोसायटीत पाळणाघर चालवणा-या महिलेच्या भावाने अल्पवयीन मुलीवर वर्षभरापासून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. 

घाबरलेल्या मुलीनं हा सारा प्रकार आपल्या आईला सांगितल्यानंतर तिच्या आईवडिलांनी याप्रकरणी मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. 

पोलिसांनी या प्रकरणी आरोपी दीपक हेराळे याला अटक केली असून त्याने पाळणाघरातील अन्य मुला मुलींसोबतही असा गैरप्रकार केला आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान या घटनेमुळे पाळणाघरंदेखील सुरक्षित नसल्याचं विदारक वास्तव समोर आलंय.