सात महिन्यांच्या चिमुकल्याला यकृत प्रत्यारोपणासाठी मदतीची गरज

डोंबिवलीत राहणाऱ्या अवघ्या सात महिन्यांच्या एका चिमुरड्याला यकृत प्रत्यारोपणासाठी मदतीची गरज आहे. यासाठी त्याचे आई-वडील आणि इतर नातेवाईक प्रयत्नशीर आहेत.  

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 16, 2016, 03:19 PM IST
सात महिन्यांच्या चिमुकल्याला यकृत प्रत्यारोपणासाठी मदतीची गरज  title=

डोंबिवली : डोंबिवलीत राहणाऱ्या अवघ्या सात महिन्यांच्या एका चिमुरड्याला यकृत प्रत्यारोपणासाठी मदतीची गरज आहे. यासाठी त्याचे आई-वडील आणि इतर नातेवाईक प्रयत्नशीर आहेत.  

सात महिन्यांपूर्वी पार्थ जन्मला तेंव्हा डोंबिवलीत राहणाऱ्या राजवाडे कुटुंबियांच्या घरी आनंदाचे वातावरण होते. मात्र जन्मतःच त्याला 'बायलरी अॅट्रेशिया' या आजाराने ग्रासले. १५ हजार मुलांमध्ये एकाला होणारा हा आजार पार्थला जडल्याने त्याचे यकृत जवळ जवळ निकामी झालंय. त्याला तातडीने यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता आहे, परंतु ३० ते ३५ लाखाच्या खर्चापुढे राजवाडे कुटुंबीय हतबल झाले आहेत. अशा परिस्थितीत पार्थचा जीव वाचविण्यासाठी, प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांना मदतीचा हात हवा आहे.

डोंबिवलीत राहणारे योगेश राजवाडे हे खासगी कंपनीत डिझायनर म्हणून नोकरी करत आहेत तर त्यांची पत्नी प्राची हिला पार्थसाठी नोकरी सोडावी लागली. गेले सात महिने त्या पार्थच्या तब्येतीत सुधारणा होण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. यकृताच्या आजारामुळे झालेली कावीळ आणि त्यामुळे झालेल्या सीरोसिस ह्या यकृताच्या आजारामुळे यकृत संपूर्ण निकामी होण्याचा धोका असल्याने आता चिमुकल्या पार्थचा जीवच धोक्यात आला आहे. 

वाडिया रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर आता यकृत प्रत्यरोपणासाठी त्यांना ग्लोबल हॉस्पिटलमध्ये जावे लागले. पार्थच्या यकृत प्रत्यरोपणासाठी ३० ते ३५ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. पार्थच्या प्रकृतीकडे लक्ष द्यायचे आणि पैशांची जमवाजमव करायची या दुहेरी परिस्थितीतून कुटुंबियांना जावे लागत आहे. त्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता आहे.

मदतीसाठी :

- parthlivertransplant.blogspot.in ह्या ब्लॉगवर पार्थला कशी मदत करता येईल ह्याची माहिती आहे. 

- ग्लोबल हॉस्पिटल, चेन्नईमधील पार्थचा UHID क्र. 1020205111. पार्थच्या मदतीसाठी काढलेला धनादेश Ravindranath GE Medical Associates Pvt. Ltd. ह्या नावाने HDFCच्या 01112090000044 ह्या खात्यावर जमा करता येईल.

- NEFT साठी बँकेचा IFSC कोड HDFC0000111

- अधिक माहितीसाठी राजवाडे ह्यांच्याशी ९९८७८०८००३ ह्या क्रमांकावर संपर्क साधता येईल