नोटाबंदीच्या काळातही सापडतायत लाचखोर

 तीन लाखांची लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या सविता चौधरच्या झालेल्या चौकशीत अमाप माया सापडली आहे.  

Updated: Nov 29, 2016, 07:50 PM IST
नोटाबंदीच्या काळातही सापडतायत लाचखोर title=

जालना :  तीन लाखांची लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या सविता चौधरच्या झालेल्या चौकशीत अमाप माया सापडली आहे.  

लाचलुचपत विभागानं तिच्या घरात केलेल्या झडतीत, बाद झालेल्या अडीच लाखांवर नोटा, चार भूखंड, घर अशी कोट्यवधींची मालमत्ता सापडली असल्याची माहिती लाचलुचपत विभागानं दिलीय. 

चौधरच्या औरंगाबादमधील दोन्ही घरांवर एकाच वेळी धाड टाकली असता ही मालमत्ता सापडलीय. आता यापैकी हिशेबी किती आणि बेहिशेबी किती याचा तपास लाचलुचपत विभाग करतंय.