वाळू माफियांची मुजोरी, उपविभागीय अधिकाऱ्यांना धक्काबुक्की

तुळजापूरमध्ये वाळू माफियांची मुजोरी वाढत आहे. वाळू माफियांकडून उपविभागीय अधिकाऱ्यांना तलवार दाखवत धक्काबुक्की करण्यात आली. 

Updated: Sep 9, 2016, 02:30 PM IST
वाळू माफियांची मुजोरी, उपविभागीय अधिकाऱ्यांना धक्काबुक्की  title=

सोलापूर : तुळजापूरमध्ये वाळू माफियांची मुजोरी वाढत आहे. वाळू माफियांकडून उपविभागीय अधिकाऱ्यांना तलवार दाखवत धक्काबुक्की करण्यात आली. 

पश्चिम महाराष्ट्रात पाय रोऊन असलेलं वाळू माफियांचं लोन आता मराठवाड्यातही पोहोचलंय. तुळजापूर विभागाचे उपविभागीय अधिकारी निलेश श्रींगी हे दोन वाळू टिप्परची तपासणी करत होते. यावेळी बोलेरो जीपमधून आलेल्या वाळू माफियांनी तलवार दाखवत  धक्काबुक्की केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. 

सोलापूर तुळजापूर रोडवरील माळूंब्रा सबस्टेशनजवळ गुरूवारी दुपारी ही घटना घडलीय. श्रींगी यांनी दिलेल्या तक्रारीवरून सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी तीन पथके रवाना केली आहेत. वाळू माफियांनी थेट उपविभागीय अधिका-यालाच तलवार दाखवल्यानं चांगलीच खळबळ माजलीय.