सैराट सिनेमाची पुनरावृत्ती सोलापुरात, पळून गेलेल्या भाचीचा मामाने केला खून

अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'सैराट' या सिनेमातील घटना सोलापुरात घडल्याने धक्काच बसलाय. आपल्या प्रियकरासोबत पळून गेलेल्या राजश्री हिचा खून तिच्याच मामाने केला. त्यानंतर मामाने तिचा मृतदेह जाळून टाकला. 

Updated: Jun 3, 2016, 07:28 PM IST
सैराट सिनेमाची पुनरावृत्ती सोलापुरात, पळून गेलेल्या भाचीचा मामाने केला खून title=

सोलापूर : अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'सैराट' या सिनेमातील घटना सोलापुरात घडल्याने धक्काच बसलाय. आपल्या प्रियकरासोबत पळून गेलेल्या राजश्री हिचा खून तिच्याच मामाने केला. त्यानंतर मामाने तिचा मृतदेह जाळून टाकला. 

भाची प्रियकराबरोबर पळून गेली. याचा राग मनात धरुन मामासह त्याच्या साथीदारांनी भाचीचा खून केला. त्याच दिवशी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तिचा मृतदेह जाळून टाकला. हा प्रकार २४ एप्रिल २०१६ रोजी मड्डी वस्ती येथे घडला. 

या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा नोंदवण्यात आलाय. राजश्री आकाश भोसले (२४, रा. रविवार पेठ, जोशी गल्ली, सोलापूर) असे दुर्दैवी मुलीचे नाव आहे. खून प्रकरणी पोलिसांनी युवराज कोंडीबा सरवदे, विनोद कोंडिबा सरवदे, किशोर ज्ञानेश्‍वर सरवदे, अनिल नारायण सरवदे, प्रभाकर शंकर भोसले, विष्णू मारुती भोसले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पांडुरंग विठ्ठल भोसले ( ४५, रा. सरवदेनगर, मुळेगाव , सोलापूर) यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. भोसले यांचा पुतण्या ईश्‍वर मारुती भोसले यांच्यासोबत २८ मार्च २०१६ रोजी राजश्री मुंबईला पळून गेली होती. याचा राग मनात धरुन आरोपींने राजश्रीला गोड बोलून मुंबईहून सोलापूरला आणले. त्यानंतर आरोपींनी कट रचून राजश्रीला ठार मारले आणि पुरावा नष्ट केला. तब्बल दीड महिन्यानंतर या प्रकरणाला हे प्रकरण उघड झाले.