'सैराट'च्या पायरसीवरून राज्यात पहिला गुन्हा दाखल

 सैराटची कोटीच्या कोटी उड्डाणे होत असताना सैराटला पायरसीचे ग्रहणही लागले आहे.  अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये हा चित्रपट डाऊनलोड करून घेतला आहे. पण या प्रकरणी पोलीस खूपच सतर्क असून पुण्यात सैराटच्या पायरसीवरून पहिला गुन्हा दाखल झाला आहे. 

Updated: May 5, 2016, 08:56 PM IST
'सैराट'च्या पायरसीवरून राज्यात पहिला गुन्हा दाखल title=

पुणे :  सैराटची कोटीच्या कोटी उड्डाणे होत असताना सैराटला पायरसीचे ग्रहणही लागले आहे.  अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये हा चित्रपट डाऊनलोड करून घेतला आहे. पण या प्रकरणी पोलीस खूपच सतर्क असून पुण्यात सैराटच्या पायरसीवरून पहिला गुन्हा दाखल झाला आहे. 

कोण आहे तो व्यक्ती...

पुणे पोलिसांनी एका युवकावर बुधवारी गुन्हा दाखल केला. कासम दस्तगीर शेख (वय २३ रा. इंदिरानगर) या युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 'प्रायव्हेट आय' कंपनीच्या राहुल मानकर यांनी तक्रार दिली आहे. 

कशी होत होती पायरसी...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'जेधे चौकातील एच. के. जी. एन. मोबाइल शॉपी या दुकानातून 'सैराट' चित्रपटाची पायरसी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मानकर यांनी स्वारगेट पोलिसांशी संपर्क साधला. 
त्यानंतर पोलिसांनी पंचांसह दुकानावर छापा टाकला. 

कसे पकडले पायरसी करणाऱ्याला...

बनावट ग्राहक पाठवला असता, कासम शेख याने १०० रुपयांत 'सैराट'ची प्रत 'पेन ड्राइव्ह'वर ट्रान्सफर करून दिली. त्यानंतर पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात आला. 

काय गुन्हा दाखल केला...

परवानगी नसताना सिनेमाची कॉपी बाळगणे आणि प्रसारित करणे याबद्दल कॉपीराइट कायद्यांतर्गत कासम शेखवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे; तसेच सीपीयू आणि पेन ड्राइव्ह असे साहित्यही जप्त करण्यात आले आहे.