‘माणिकचंद' नाव नगरपालिकेच्या सभागृहाला कशासाठी?

शिरुर नगरपालिकेच्या नगरपालिकेच्या सभागृहाला एका ‘गुटखाकिंग’चं नाव दिल्याबद्दल मुंबई हायकोर्टानं शिरूर नगरपालिकेवर ताशेरे ओढले आहेत.

Updated: Nov 4, 2014, 09:43 PM IST
‘माणिकचंद' नाव नगरपालिकेच्या सभागृहाला कशासाठी? title=

मुंबई : शिरुर नगरपालिकेच्या नगरपालिकेच्या सभागृहाला एका ‘गुटखाकिंग’चं नाव दिल्याबद्दल मुंबई हायकोर्टानं शिरूर नगरपालिकेवर ताशेरे ओढले आहेत.

माणिकचंद गुटख्याचे मालक रसिकलाल माणिकचंद धारिवाल यांच्यावर मोक्का कायद्याखाली आरोप असताना पुणे जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या शिरूर नगरपालिकेच्या सभागृहाला त्यांचं नाव कसं दिलं? असा सवाल उपस्थित केलाय.

रसिकलाल धारिवाल शिरूरचे भूमीपुत्र असल्यानं नगरपालिका इमारतीतल्या एका सभागृहाला त्यांचं नाव द्यायला हवं, असा ठराव नगरपालिकेनं 3 सप्टेंबर 2002 ला केला होता. त्यानंतर  नगरपालिकेकडे निधीची कमतरता असल्यानं नागरिकांनी आणि दात्यांनी तसंच स्वयंसेवी संस्थांनी विकास कामांसाठी देणग्या द्याव्यात, असा ठराव नगरपालिकेनं 11 जुलै 2007 रोजी केला. 

त्यानंतर रसिकलाल धारिवाल यांनी 11 लाखांची देणगी दिलीय. उल्लेखनीय म्हणजे मुख्याधिकाऱ्यांनी त्याबाबत इमारतीसाठी देणगी  मिळाल्याची पावतीही त्यांना दिली होती. 

यावरून सभागृहाला धारिवाल यांचे नाव देण्यासाठीची मिलीभगत असल्याचा संशय व्यक्त करत शिरूर येथील सामाजिक कार्यकर्ते हरकचंद खाबिया यांनी विरोध दर्शवत याचिका दाखल केली होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.