बलात्कार पीडित महिलेची आरोपीच्या शेतात आत्महत्या

सांगलीत एका बलात्कार पीडित महिलेनं आत्महत्या केली आहे. अत्याचार करणा-या आरोपीवर कारवाई होत नसल्यानं तिनं स्वतःचं जीवन संपवलं. 

Updated: Aug 7, 2016, 06:46 PM IST
बलात्कार पीडित महिलेची आरोपीच्या शेतात आत्महत्या  title=

सांगली : सांगलीत एका बलात्कार पीडित महिलेनं आत्महत्या केली आहे. अत्याचार करणा-या आरोपीवर कारवाई होत नसल्यानं तिनं स्वतःचं जीवन संपवलं. आरोपीच्या शेतातील घरातच गळफास घेऊन या महिलेनं आत्महत्या केली आहे. 

आत्महत्या करण्यापूर्वी या महिलेनं चिठ्ठीमध्ये आणि भिंतीवर आरोपीचं नाव लिहून ठेवलं. तिच्या आत्महत्येनंतर सुमारे तीनशे नागरिकांनी मिरज पोलीस ठाण्याला घेराव घातला. 

विशेष म्हणजे या प्रकरणात महिन्यापूर्वीच गुन्हा दाखल झाला होता. मात्र संशयित आरोपीला अटक झालेली नाही. उलट आरोपीच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून पीडित महिलेवरच पोलिसांनी शनिवारी खंडणीचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केलाय.