'लक्ष्मी'च्या वक्तव्यावर दानवेंचं लंगडं समर्थन

भारतीय संस्कृतीत पैशाला लक्ष्मी असं संबोधलं जातं, मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी लक्ष्मीची परिभाषाच बदलून टाकली आहे.

Updated: Dec 19, 2016, 08:02 PM IST
'लक्ष्मी'च्या वक्तव्यावर दानवेंचं लंगडं समर्थन  title=

जालना : भारतीय संस्कृतीत पैशाला लक्ष्मी असं संबोधलं जातं, मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी लक्ष्मीची परिभाषाच बदलून टाकली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठणमधल्या प्रचारसभेत आपण पैशाचा कुठेही नामोल्लेख केलेला नाही. लक्ष्मी म्हणजे पैसा नव्हे. लक्ष्मी ही देवता आहे. या देवतेचं नामस्मरण आपण दिवसभर करत असतो. त्यामुळे निवडणूक आचारसाहितेचा भंग होत नसल्याचं लंगडं समर्थन दानवेंनी केलं आहे.

दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्याच्या निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. केवळ पैठणच नव्हे तर भाजपा जिथं निवडणूका लढलीये त्या सगळीकडची चौकशी करण्याची मागणी सचिन सावंत यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.