मुंबई : रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात अनेक ठिकांनी गडगडाटसह पाऊस पडला. काही ठिकाणी वादळाने झाडांची पडझड झाली. तर सांगलीत विजांचा कडकडाटासह वादळी पाऊस झाला.
रत्नागिरीत संगमेश्वर, साखरपा येथे हलका पाऊस झाला. तर चिपळूण मध्ये मुसळधार पाऊस झाला. तर राजापूर तालुक्यातील हातिवले, कोंढये गावांत गारपीटीसह पाऊस झाला. दरम्यान, १४ ते १६ मार्चदरम्यान पाऊस कोसळण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. त्यामुळे आंबा, काजू पिकांना या पावसाचा धोका उद्धभ शकतो. जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे आंबा पिकावर परिणाम होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीत मेघ गर्जनेसह पावसाचा शिड्कावा झाला. तर रायगडमधली महाड येथे गडगडाट पाऊस कोसळली. तर पोलादपूर तालुक्यात वादळी पावसासह जोरदार गारपीट झालीय. पावसासोबत वीजांचा लखलखाट आणि ढगांचा गडगडाट सुरु होता. वादळामुळे झाडे, फांद्या कोसळण्याच्या तुरळक घटनाही घडल्यायत.
सांगलीत आष्टा परिसरात जोरदार वीजांचा कडकडाट आणि वादळी वारे सुरु होते. दुष्काळी मान तालुक्यातील मार्डी गावासह परिसरातील गावांमध्ये आज पहाटे झालेल्या गरपीटी मुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालय. गरपीटीमुळे ऐन दुष्कळात कबाड़ कष्ट करुन् वाढवलेल्या गहु, कांदा, हरभरा, डाळिंब यासह अन्य छोट्या पिकांचे नुकसान जाले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.