किल्ले रायगडच्या विकास आराखड्याला मंजुरी

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड यांच्यावतीने किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा सोमवारी साजरा करण्यात आला. यावेळी तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.  रायगड किल्ला आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी कोकण विभागीय आयुक्तांनी तयार केलेल्या ५०० कोटी रुपयांच्या आराखड्यास मुख्यमंत्र्यांनी यावेळी मंजुरी दिली  

Updated: Jun 6, 2016, 06:08 PM IST
किल्ले रायगडच्या विकास आराखड्याला मंजुरी title=

रायगड : अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड यांच्यावतीने किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा सोमवारी साजरा करण्यात आला. यावेळी तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.  रायगड किल्ला आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी कोकण विभागीय आयुक्तांनी तयार केलेल्या ५०० कोटी रुपयांच्या आराखड्यास मुख्यमंत्र्यांनी यावेळी मंजुरी दिली  

या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, शिवराज्याभिषेक समितीचे मार्गदर्शक छत्रपती संभाजीराजे, आमदार सुनील तटकरे, जयंत पाटील, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, रायगड जिल्हाधिकारी शीतल तेली उगले आणि रायगड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

काय आहे रायगडाच्या विकासाचा आराखडा

भारतीय पुरातत्व विभागामार्फत सुमारे ८४ लाखांची कामे, रायगड किल्ला, पाचाड येथील समाधी आणि वाडा परिसराकरिता ४५ लाखांची कामे, रायगड परिसरातील पर्यटन सात किमी परिसरातील २१ गावे आणि वाड्यामधून पायाभूत सुविधांची कामे, अशी सुमारे ५०० कोटींची कामे आहेत.

राज्याभिषेकास उपस्थित राहणारे पहिले मुख्यमंत्री

गेली अनेक वर्षे रायगडावर ६ जूनला शिवराज्याभिषेक दिन साजरा होतो. यंदाचे वर्ष हे शिवराज्याभिषेक दिनाचे ३४३ वे वर्ष होते. या सोहळ्याचे निमंत्रण दरवर्षी मुख्यमंत्र्यांना दिले जाते मात्र देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री आहेत ज्यांनी हे निमंत्रण स्वीकारलेच या राज्याभिषेकास उपस्थित राहिले.