'विखे पाटील अगोदर तुमचा दारु कारखाना बंद करा'

चंद्रपुरात दारु बंदी होते तर मग महाराष्ट्रात का नाही असा सवाल विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलाय. पण, त्यांचं हे विधान त्यांच्याच अंगलट आलंय.

Updated: Jun 25, 2015, 10:55 AM IST
'विखे पाटील अगोदर तुमचा दारु कारखाना बंद करा' title=

मुंबई : चंद्रपुरात दारु बंदी होते तर मग महाराष्ट्रात का नाही असा सवाल विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलाय. पण, त्यांचं हे विधान त्यांच्याच अंगलट आलंय.

महाराष्ट्रातील दहा साखर कारखानं मद्य निर्मीती करतात. राज्य सरकारने दारुबंदीचा निर्णय जाहीर करावा आणि सहकार आयुक्तांमार्फत साखर कारखान्यांना कळवावा. नैतीकता म्हणून साखर कारखाने दारु निर्मीती बंद करण्याचा निर्णय घेतील, असंही विखे-पाटील यांनी म्हटलंय.

पण, विखे-पाटलांनी मराठी तरुणांच्या चार पिढ्या बरबाद केल्या, आधी स्वतःचा दारू कारखाना बंद करा, असा हल्लाबोल दारूबंदी आंदोलनाच्या कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी यांची विखे पाटील यांच्यावर केलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.