पुणे: पुणे विद्यापीठाचा ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असा शनिवारी नामविस्तार करण्यात आला. नामविस्तार करण्यात आलेल्या फलकाचं आणि वेबसाईटचं राज्यपाल के. शंकरनारायनन यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं.
माजी केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते.
पुणे विद्यापीठाचा नामविस्तार सावित्रीबाई फुले यांच्या नावानं केल्यामुळं प्रागतिक आणि आधुनिकतेचा विचार नव्या पिढीर्पयत जाईल, अशी अपेक्षा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केली.
तसंच सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्याची मागणी रास्त असून, सोलापूरकरांनी विद्यापीठाकडे याबाबत आग्रह धरल्यास यश मिळेल, असा विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना यासंदर्भातील पाठपुरावा करण्याच्या सूचना दिल्या. तर जळगाव विद्यापीठाला बहिणाबाई चौधरींचं नाव घावं अशी मागणी भुजबळांनी यावेळी केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.