'एमपीएससी'च्या कारभारावर पुण्यातील विद्यार्थी नाराज

महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच, एमपीएससीच्या गलथान कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. याचा फटका अर्थातच विद्यार्थ्यांना बसला आहे. एमपीएससीने १०९ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी १० एप्रिलला राज्यातील ३६ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. 

Updated: Dec 28, 2015, 10:47 PM IST
'एमपीएससी'च्या कारभारावर पुण्यातील विद्यार्थी नाराज title=

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच, एमपीएससीच्या गलथान कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. याचा फटका अर्थातच विद्यार्थ्यांना बसला आहे. एमपीएससीने १०९ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी १० एप्रिलला राज्यातील ३६ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. 

पुण्यातून एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या राज्यात सर्वाधिक आहे. पुण्यातून जवळपास पन्नास हजार विद्यार्थी ही परीक्षा देतात. मात्र, एमपीएससीने पुण्यासाठी फक्त अठराशे विद्यार्थ्यांचा कोटा ठेवला आहे. तर, इतर केंद्रांसाठीचा कोटा हजारोंच्या घरात ठेवला आहे. 

एमपीएससीच्या या निर्णयावर विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, एमपीएससीने परीक्षा शुल्क देखील ५२३ रुपये केले आहे. त्यालाही विद्यार्थ्यांनी विरोध केला आहे. राज्यात दुष्काळ असताना, एमपीएससी साडे पाचशे रुपये शुल्क का आकारते आहे, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.