पुण्यातील हे कुटुंब १५ वर्षांपासून राहतंय शौचालयात

 गेल्या १५ वर्षांपासून पुण्याच्या दांडेकर पूल परिसरात एका सार्वजनिक शौचालयात राहत असल्याचे धक्कादायक प्रकार iamin.in या वेबसाइटने समोर आणला आहे. 

Updated: Aug 19, 2015, 06:15 PM IST
पुण्यातील हे कुटुंब १५ वर्षांपासून राहतंय शौचालयात title=
Pics: Anvi Mehta/iamin

पुणे :  गेल्या १५ वर्षांपासून पुण्याच्या दांडेकर पूल परिसरात एका सार्वजनिक शौचालयात राहत असल्याचे धक्कादायक प्रकार iamin.in या वेबसाइटने समोर आणला आहे. 

राजू सावंत, याचे कुटुंबिय या ठिकाणी राहत आहे. राजू सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार एका माजी नगरसेवकाने या सार्वजनिक शौचालयाची देखभाल करण्याची जबाबदारी दिली होती. त्यानंतर पुणे महापालिकेचा कोणताही अधिकारी पाहणी करण्यासाठी आले नाही किंवा या कामाचा मोबदला देण्यासाठीही कोणी या ठिकाणी आलं आहे. 

आता हे कुटुंब या बांधलेल्या शौचालयात राहत आहेत. असे राहणे अनधिकृत आहे. माजी महापौर दत्तात्रय गायकवाड आणि दिवंगत नगरसेवक अरूण धिमधिमे यांनी निलायम पूलाकडे जाणारा रस्त्यावर दांडेकर पुलावर या शौचालयाचे उद्घाटन केले. 

या शौचालयाची देखभाल करण्याची जबाबदारी सावंत यांच्यावर पडली. त्यावेळी त्यांना या ठिकाणीच राहण्यास सांगितले होते. त्यावेळी सावंत यांच्याकडे राहण्यास घर नव्हते. शौचालयातच एक खोली तयार केली त्या ठिकाणी आम्ही राहत होतो, असे सावंत यांनी सांगितले. 

शौचालय वापरण्यासाठी जे व्यक्ती येतात, त्यांनी दिलेल्या पैशावरच या कुटुंबाची गुजराण होत आहे. प्रती व्यक्ती १ किंवा २ रूपये घेतले जातात, त्यामुळे मला दुसरीकडे घर घेणे शक्य नाही. त्यामुळे एक तात्पुरते झोपडं बांधल असल्याचे सावंत यांनी सांगितले. 

सावंत आपल्या पत्नी आणि तीन मुलांसह या ठिकाणी राहतात. 

सौजन्य - iamin.in 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.