संतापजनक, कोथरूडमधील सोसायटीत आई-मुलीला बेदम मारहाण

घरात कुत्र्याची पिल्लं पाळण्यावरून पुण्यात कोथरूडमध्ये दोन महिलांना बेदम मारहाण करण्यात आलीय. 

Updated: Sep 26, 2016, 09:18 PM IST

पुणे : घरात कुत्र्याची पिल्लं पाळण्यावरून पुण्यात कोथरूडमध्ये दोन महिलांना बेदम मारहाण करण्यात आलीय. 

सेजल श्रॉफ आणि तिच्या आईला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकाप सीसीटीव्हीत कैद झालाय. मारहाण करणा-या मिलिंद काळे या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झालाय. कोथरूडच्या महात्मा सोसायटीत हा प्रकार घडलाय. 

20 वर्षीय सेजल सराफ आणि तिच्या आईने घरात रस्त्यावरची दोन कुत्र्याची पिल्लं पाळली होती. पण त्याला शेजारी राहणा-या मिलिंद काळेचा विरोध होता. 

या पिल्लांना घेऊन जाण्यासाठी मिलिंद काळेने महापालिकेची श्वान पथकाची गाडी बोलावली. तक्रारदार महिलेने कुत्र्याची पिल्लं दोन महिन्यांची असल्याचं सांगत नेण्यास नकार दिला. 

त्यामुळे चिडलेल्या मिलिंद काळेने तरूणी आणि तिच्या आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात सेजल सराफ यांचा दात पडला एवढी मारहाण करण्यात आलीय.