पुण्यात सिलिंगवरून पडून मुलाचा मृत्यू

रॅकेट खेळताना हाँलच्या सिलिंगवर पडलेलं फुल काढायला गेलेल्या विद्यार्थ्यांचा सिलींग तुटल्याने पडुन मृत्यु झाला. शुभम खंडाळे असं या विद्यार्थ्याचं नाव असुन तो पुणे महापालिकेच्या राजीव गांधी ई लर्निंग स्कूलमध्ये 6 वी त शिकत होता.

Updated: Nov 29, 2016, 10:58 PM IST
पुण्यात सिलिंगवरून पडून मुलाचा मृत्यू title=

पुणे : रॅकेट खेळताना हाँलच्या सिलिंगवर पडलेलं फुल काढायला गेलेल्या विद्यार्थ्यांचा सिलींग तुटल्याने पडुन मृत्यु झाला. शुभम खंडाळे असं या विद्यार्थ्याचं नाव असुन तो पुणे महापालिकेच्या राजीव गांधी ई लर्निंग स्कूलमध्ये 6 वी त शिकत होता.

दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शुभम आपल्या मित्रांसोबत तिस-या मजल्यावर असणा-या आपल्या वर्गा बाहेर बैडमिंटन खेळत होता. खेळताना पोर्चला लागूनच असलेल्या हॉलच्या सिलिंगवर त्याचं फुल पडल्याने ते काढण्यासाठी शुभम पोर्च च्या खिडकीतून सिलिंग वर उतरला.

सिलींग पुठ्ठ्याचं असल्याची कल्पना त्याला नव्हती. सिलींगचा पुठ्ठा फाटल्याने शुभमचा तोल गेला आणि तो खालील हाँल मध्ये कोसळला. घटना झाल्यावर लगेचच त्याला राव हास्पिटल मध्ये दाखल केलं, मात्र त्यावेळी त्याचा मृत्यु झाल्याचं डाँक्टरनी सांगितलं.